राज्यात मराठा आंदोलन पुन्हा पेटणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलक आक्रमक होणार आहे. याची प्रचिती गुरुवारी बीडमध्ये आली. बीडमध्ये तिघांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत एसटी रोखून चालक व मेकॅनिकला बाहेर काढत गाडीत पेट्रोल टाकून आग लावली. ही घटना बीडच्या घोडका राजुरीजवळ घडली. बीडच्या घोडका राजुरीजवळ काही अज्ञात लोकांनी एसटीबस कारमध्ये लावून अडवली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा दिल्या. एसटी बसमधून चालक आणि मेकॅनिकला त्यांनी खाली उतरवलं व बसमध्ये पेट्रोल ओतले. व आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करत आग लावली. या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले. गाडीतील चार सीट व केबिन जाळून खाक झाले. दरम्यान, आंदोलक बाहेर गेल्यावर चालक व मेकॅनिकनं यांनी तातडीने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही एसटीबस हिवरापहाडी येथे मुक्कामी आली होती. मात्र, या गाडीत बिघाड झाल्याने मेकॅनिक उत्तम राऊत व राम कुलथे हे ही बस दुरुस्तीसाठी घेऊन निघाले होते. त्यामुळे गाडीत प्रवासी नव्हते.
- Advertisement -