भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.. एका मोठ्या नेत्यानं एबीपी माझाला ही माहिती दिलीय. महायुती सरकारसोबत आलेल्या धनंजय मुंडेंना परळी विधानसभेचं तिकीट निश्चित झाल्याचीही माहिती आहे. मुंडे बहिण-भावांमध्ये या मुद्दयावर एकमत झालंय का? बहिण-भावांमधला दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला.
गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीतून निघाले होते. त्या गाडीचे साध्य धनंजय मुंडे करत होते. मात्र अचानक गाडी बदलण्याचा निर्णय झाला आणि सगळेजण गाडीच्या खाली उतरले. मात्र यावेळी धनंजय मुंडे यांच्या गाडीतून खाली उतरलेले देवेंद्र फडणवीस सरळ पुढे गेले आणि पंकजा मुंडे बसलेल्या गाडीमध्ये जाऊन बसले.
देवेंद्र फडणवीसांनी मुंडे बहिण भावांनी एकत्र काम करण्याची विनंती थेट व्यासपीठावरुन केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनीही मान दिला आणि यापुढे एकत्र काम करण्याचे संकेत दिले.