Saturday, May 25, 2024

तुम्ही वर्गणी काढून मला घर बांधून द्या…. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वर्गणी काढून बीडमध्ये घर बांधून देण्याचं आवाहन केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सर्वात आधी बीडमध्ये घर बांधायाला सुरुवात करणार आहे. मला तुम्ही जागा घेऊन दिली तर मी बीडमध्ये घर बांधेन, कारण माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही सर्वांनी वर्गणी काढून जागा घेऊन दिली तर मी तिथे भूमीपूजन करेन, पहिली कुदळ मारेन आणि तुमच्याच नावावर घर बांधेन. त्यानंतर मरेपर्यंत तिथे राहीन. आपण बीडमध्ये छान घर बांधू. आष्टी, गेवराई आणि बीड मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी बीडमधल्या घरात राहीन तर केज, माजलगाव आणि परळी मतदारसंघात कामं असतील तेव्हा मी परळीत मुक्काम करेन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देते. या घरांमध्ये राहीन आणि येथूनच तुमच्याबरोबर संपर्कात राहीन. मी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतेय, मतदारांना नाही. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी इथे राहण्याचा माझा मानस आहे.

Related Articles

1 COMMENT

  1. ताईने चिक्की खाऊन पोट नाही भरले वाटते. आता लोकांना मत मागायचे सोडून पैसे मागतेय.
    ताईंना आता रामराम करा आणि नवीन लोकांना संधी द्या.

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles