भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करणारे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे आणि नारायण शिरसाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायमूर्ती ए.एस. वाघवसे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. सोनवणे यांना चार आठवड्यात (२४ ऑक्टोबर रोजी ) उत्तर दाखल करावयाचं आहे.
सोनवणे यांनी त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केलं आहे. त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र २०० कोटीपेक्षा जादा आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचा उल्लेख शपथपत्रात केला नाही, असंही याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे आता या याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना खासदार बजरंक सोनवणे कसं उत्तर देतात आणि त्यावर न्यायालयाकडून काय निकाल येतो हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.