संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान त्याने मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली आहे. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली आहे. या अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे सुचवले आहे, अशी माहिती आहे.






