Monday, June 17, 2024

मतदान कक्षात मतदारांवर दबाव… रोहित पवारांनी शेअर केले व्हिडिओ…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हीडिओ बीडच्या परळी येथील असल्याचे सांगितले जाते. या व्हीडिओत एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्राजवळ उभे असलेल्या मतदाराला एक व्यक्ती सूचना देताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती मतदारांना कोणते बटन दाबा, हे सांगताना दिसत आहे. यावर रांगेत उभे असलेले इतर मतदार ज्याचे मतदान त्यांना करु द्या, असे सांगत आहेत. मात्र, तरीही मतदारांना सूचना देणारी व्यक्ती तिथेच उभे राहून मतदारांना सूचना देताना दिसत आहे. यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

https://x.com/RRPSpeaks/status/1791794874368643317

परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवे तसे मतदान भाजपने गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का? हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही. निवडणूक आयोग या गुंडगिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे?, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles