Tuesday, March 18, 2025

बीडमध्ये राजकारण तापले, मनोज जरांगे पाटलांचं नाव घेऊन राजकारण कराल, तर…

बीडमध्ये देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीर उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत. मराठा समाजाचा असतांना, रक्तामासांचा नसतांना मला एका भावाप्रमाणे पंकजाताईंनी सांभाळलंय. मात्र, आज जर कोणी जरांगे पाटलांचं नाव घेऊन निवडून येण्याचा प्रयत्न करत असेल, तर या निवडणुकीमध्ये त्याला धडा शिकवला जाईल. असं म्हणत आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
यावेळी ते म्हणाले, की स्वर्गीय मुंडे साहेब असतील. धनु दादा असेल किंवा पंकजाताई असेल, यांनी कधीही जातीपातीचा राजकारण या महाराष्ट्रात केलं नाही. माझ्यासारखा मराठा समाजाचा आमदार होत असताना राजकीय कुठली पार्श्वभूमी नसताना त्यांनी साथ दिली. पंकजाताईंनी रक्ता मांसाचा नसलो तरी एका भावाप्रमाणे सांभाळलं आहे, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे.

आज बीड जिल्ह्यामध्ये कोणी जरांगे पाटलांचे नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करू पाहत असेल, तर त्याला कोणी थारा देणार नाही. जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. त्यांनी कुणाला पाडा आणि कुणाला निवडून आणा ? असं काही सांगितलं नाही. जाणीवपूर्वक काही मंडळी सोशल मीडियावर आयटीसीएलच्या माध्यमातून जे काही राजकारण करू पाहत आहेत. जे कमेंट्स करत आहेत, त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवला जाईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles