Wednesday, April 17, 2024

डी.जे चा दणदणाट अन् लाडक्या जावयाची गाढवावरुन मिरवणूक

बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. गावामध्ये ही परंपरा गेल्या १० दशकांपासून आहे. लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्खे गाव डीजेच्या तालावर नाचते.सासरवाडीत जावयाचा मोठा मान असतो. लाडाचा जावई जर सासुरवाडीला आला तर त्याचा पाहुणचार करण्यात कसलीच कसर ठेवली जात नाही. मात्र बीडमधील एक याला अपवाद आहे. बीडमधील विडा गावात जावयाची गाढवावर बसवूनन वाजत- गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेत आतापर्यंत तब्बल 90 जावयांना गाढवावरती बसून वाजत गाजत गावात मिरवले गेले आहे.

त्यामुळे धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात. मात्र शेर असलेल्या जावयास मेहुणे मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून काढते. या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात आणि मग सुरू होते जावयाची गदर्भ स्वारी. यावर्षी गाढवावर स्वार होण्याचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळाला. एकनाथ पवार यांचे ते लाडके जावई आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles