अहमदनगर |-निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा जलाशयाचे नाव बदलण्यात आले आहे. भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.जलाशयाच्या नामकरणासाठी अनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णयात म्हंटले आहे कि, “जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”
त्यानंतर आज भंडारदरा जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्यात आले आहे.