Monday, July 22, 2024

Bhandardara…सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे. सांदण दरी परिसरात पावसाळी पर्यटनाला पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. नाशिक , मुंबई , पुणे (Pune), अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे पावसाळी सहलीसाठी दाखल होतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात करण्यात आला आहे

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे सांदण दरी आहे. प्रत्येक वर्षी देशभरातील हजारो पर्यटक सांदण दरीला भेट देत असतात. मात्र पावसाळ्यात या दरीच्या प्रवेशद्वारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाने चार महिने सांदण दरी येथे प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये ‘सांदण दरी’चा दुसरा क्रमांक लागतो. म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 किमी लांबवर पसरलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles