Monday, March 4, 2024

भाजप आमदाराच्या दबावात कंपनीला बेकायदा वीज पुरवठा, नगरमध्ये महिलेचे उपोषण

माजी मंत्री धस यांनी राजकीय दबावाने भांगे ऑरगॅनिक केमिकल कंपनीत बेकायदेशीर विद्युत पुरवठा सुरू केल्या असल्याचा आरोप.

भांगे कंपनी बळकवण्यासाठी राजकीय दबावापोटी सेंट्रल बँक ऑफ पुणे, महावितरण कंपनी व पोलीस सहकार्य करीत असल्याचा आरोप.

नगर (प्रतिनिधी)- खडका फाटा ता.नेवासा येथील भांगे ऑर्गानिक केमिकल्स प्रा.लिमिटेड कंपनीचा विद्युत पुरवठा बंद केलेला होता. या कंपनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळे बँकेने कंपनी सील करून ताब्यात घेतलेली असताना महावितरण कंपनीने माजी मंत्री सुरेश धस व प्राजक्ता सुरेश धस यांच्या राजकीय दबावापोटी आमच्या परस्पर कनेक्शन देऊन केमिकल कारखाना सुरू करण्यास कटकारस्थान करून गुंडांना सहकार्य केलेले आहे. कंपनीत दुर्घटना घडल्याने याला जबाबदार कोण? यापूर्वी १९ डिसेंबर २०२२ रोजी कंपनीत स्फोट होऊन चार कामगार गंभीर रकमे झाले होते त्या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे कंपनी बंद होती. त्या पार्श्वभूमीवर आज महावितरण कंपनीच्या नेवासा येथील कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्याचे समजते वास्तविक या प्रकरणात न्यायालय नेवासा येथे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असताना विद्युत पुरवठा सुरू केले या प्रकरणी माननीय अधीक्षक अभियंता महावितरण अहमदनगर यांच्याकडे माहिती अधिकारात २२ डिसेंबर २०२३ रोजी कागदपत्राची मागणी केली असता ११ जानेवारी २०२४ रोजी पोस्टाने जन माहिती अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ग्रामीण) महावितरण अहमदनगर यांच्याशी संपर्क करण्याबाबत लेखी प्राप्त झाले आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांना असे प्रत्यक्ष भेटले असता अर्ज मिळालेलाच नाही असे सांगितले व अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे देऊन माहिती न भेटल्यास अपील करा असे सांगण्यात आले आहे. कंपनी बळकवण्यासाठी राजकीय दबावापोटी सेंट्रल बँक ऑफ पुणे, महावितरण कंपनी व पोलीस सहकार्य करीत असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर येथील विद्युत महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना भांगे ऑर्गनाईक केमिकल्स कंपनीचे संचालिका स्मिता संजय भांगे समवेत अक्षता भांगे, अनिकेत भांगे आदी..

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles