Wednesday, April 17, 2024

उद्धव ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारची इमोशनल पोस्ट; ठाकरेंचा आणखी एक शिलेदार नाराज !

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. एकेकाळी उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे नाराज होऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडले. इतकंच नाही, तर ४० आमदारांनासोबत घेऊन त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्तास्थापन केली. शिंदे कधी ठाकरेंची साथ सोडणार, अशी कल्पना शिवसैनिकांच्या मनातही नव्हती. आता ठाकरेंचा आणखी एक शिलेदार नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे
भास्कर जाधव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“आज माझ्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचे सिंहावलोकन करताना मला 1985 पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच 2007 पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात”.

“अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्यकर्ते असं बोलताना मी पाहिले आहे, परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधले. होय, तुम्ही सर्व माझे सहकारीच आहात”, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
“तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत आणि त्याच ऊर्जेतून मी विकासाच्या रुपाने तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये अथवा सार्वजनिक स्वरुपात खंबीरपणे तुमच्या पाठी उभा राहिलोय. अनेक दिग्गज मातब्बरांविरोधात प्रसंगी संघर्षही केलाय. स्वतःचे कुटुंब माता शारदादेवीच्या हवाली सोडून रानावनात भटकून तुम्हा सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही”.

“या सर्व कालखंडात माझ्या वक्तृत्व आणि कर्तृत्वामुळे मी यशाची अनेक शिखर पार करू शकलो. मित्रांनो, गेली 42 वर्षे सातत्याने राजकारणात एकेक पायरी वर चढण्याचा मान या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या भास्कर जाधवलाच मिळालाय”, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles