Friday, June 14, 2024

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक लोकशाही आघाडीची ‘यांना’ उमेदवारी जाहीर

विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात शिक्षक लोकशाही आघाडी तर्फे प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी
महाराष्ट्र राज्य विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात येत्या जूनमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडी या पुरोगामी विचारांच्या संघटनेने अहमदनगर येथील प्राध्यापक भाऊसाहेब कचरे या शिक्षक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे.बुधवार दि .२२ मे आझम कॅम्पस पुणे येथे महाराष्ट्र टीडीएफ चे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले .यावेळी महाराष्ट्र टीडीएफचे महासचिव हिरालाल पगडाल, कार्याध्यक्ष जी. के .थोरात, नाशिक विभाग टीडीएफ चे अध्यक्ष संजय पवार( धुळे), आर .एच .बाविस्कर,(जळगाव ) आबासाहेब कोकाटे (अहमदनगर ) टी.एन. पाटील( नंदुरबार, ) नानासाहेब फुंदे(मुंबई), मुख्याध्यापक संघाचे राज्याचेअध्यक्ष श्री केरूभाऊ ढोमसे (पुणे) या उमेदवार निवड समितीच्या सदस्यांसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
टीडीएफ अर्थात शिक्षक लोकशाही आघाडीचे या मतदार संघात प्राबल्य असून 1988 पासून अस्तित्वात आलेल्या नासिक, अहमदनगर ,जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात झालेल्या सहा निवडणुकांपैकी पाच निवडणुकांमध्ये टीडीएफ या संघटनेचेच शिक्षक उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मागील निवडणुकीत टीडीएफ विचारांच्या अनेक शिक्षक उमेदवारांनी उमेदवारी केल्याने टीडीएफ च्या मतांची विभागणी होऊन टी डी एफ चा उमेदवार पराभूत झाला होता . आता उमेदवारीची घोषणा अधिकृतपणे झाल्याने मतविभागणी टाळण्यासाठी इतर इच्छुकांनी सहकार्य करावे व संस्थाचालकांचा शिरकाव झालेल्या या मतदार संघात पुनश्च शिक्षक कार्यकर्त्यालाच विजयी करावे. विधान परिषदेत टीडीएफच्या आमदारांनी सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादी च्या धोरणाचा पुरस्कार केला असल्याने आघाडीकडूनही पूर्वीप्रमाणेच पाठिंबा मिळेल असा विश्वास महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी व्यक्त केला आहे.
विद्यमान आमदार किशोर दराडे, नासिक जिल्हा मराठा या संस्थेचे विश्वस्त ऍडवोकेट संदीप गुळवे यांच्यासह या विभागातील इतर दहा इच्छुक उमेदवारांनी दिनांक 10 मे रोजी शिर्डी येथे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या .
प्राध्यापक भाऊसाहेब कचरे हे दीर्घकाळ संघटनेचे पदाधिकारी असून अहमदनगर जिल्ह्यातील टीडीएफ सहित सर्व शिक्षक संघटनांनी एकमताने त्यांच्या नावाची शिफारस महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीकडे केलेली आहे तसेच प्रा.कचरे हे अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था या 12000 शिक्षक सभासद असलेल्या संस्थेचे 1998 पासून नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या या संस्थेत कर्जावर अवघा ७% व्याजदर व संस्थेत अनेक सभासद हितांच्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे ही संस्था राज्यातील शिक्षकांच्या संस्थेमध्ये
” मार्गदर्शक संस्था “म्हणून ओळखली जाते. उमेदवारी देताना टीडीएफ संघटनेच्या राज्य नेतृत्वाने शैक्षणिक संस्था चालकांचा विचार न करता अखेर सर्वसामान्य शिक्षक कार्यकर्त्याला न्याय दिल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मागील निवडणुकीत निवडून आलेले आमदार टीडीएफ विचारधारा मानणारे नव्हते व शिक्षकही नव्हते तसेच त्यांचा शिक्षक चळवळीशी कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे या विभागातील शिक्षक व शिक्षक कार्यकर्त्यांनी यावेळी शिक्षकांचा प्रतिनिधी हा संस्थाचालक नव्हे तर शिक्षक कार्यकर्ताच असावा असा आग्रह धरला होता.
10 जून रोजी होणारी निवडणूक शाळांना सुट्टी असल्याचे कारण दाखवून काही संघटनांच्या मागणीवरून शाळा सुरू झाल्यानंतर नव्याने अधिसूचना निघून आता ही निवडणूक जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असून या मतदारसंघात माजी आमदार किशोर दराडे हे परत इच्छुक असून त्यांच्याबरोबर नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक या संस्थेचे विश्वस्त ऍड. संदीप गुळवे व कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे , माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे ही सर्व शैक्षणिक संस्थाचालक सुद्धा या शिक्षकांच्या मतदार संघात निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles