सामाजिक कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात भाऊंचे मोठे योगदान – सरपंच अमोल आव्हाड
नगर – ज्या समाजात आपण राहतो, त्यांच्यासाठी काही तरी देणे लागतो, गोर-गरीब, वंचित घटकांसाठी स्वत: पदरमोड करुन समाजसेवेचे व्रत जोपासणारे भिमराज आव्हाड यांनी सामाजिक कार्याबरोबरच आध्यात्मिक क्षेत्रात देखील मोठे योगदान दिले आहे. पांगरमल गावातील भैरवनाथ मंदिर, निर्मल नगर व सारसनगर येथील संत भगवान बाबा मंदिर असो, नगर जिल्ह्यातील कोणत्याही गावात भगवान बाबांचे मंदिर असो, अशा ठिकाणी भाऊंचे सेवाभावी कार्य घडलेले आहे, त्यांच्या या कार्याचा गौरव करणे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सरपंच अमोल आव्हाड यांनी केले.
नगर तालुक्यातील शिंगवे तुकाई येथील कुलदैवत तुकाई माता मंदिरात भिमराज आव्हाड यांनी सपत्नीक देवीची महापूजा, अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पांगरमल ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अमोल आव्हाड, उपसरपंच कविता आव्हाड, वैशाली आव्हाड पंचायत समिती सदस्य मंगल आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड, मनिषा आव्हाड, उद्धव आव्हाड, अक्षय आव्हाड, गोरख आव्हाड, सुनिल आव्हाड, हर्षद आव्हाड, नाना आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, आदिनाथ आव्हाड, ऋषिकेश आव्हाड, अभिषेक आव्हाड, अजय आव्हाड, सतिश आव्हाड, पांडूरंग आव्हाड, बाबासाहेब आव्हाड, संभाजी आव्हाड, शिवाजी आव्हाड, संतोष आव्हाड, आत्माराम आव्हाड आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच अमोल आव्हाड म्हणाले, भिमराज आव्हाड हे पांगरमल गावचे भुषण आहे, गावात सामाजिक कार्याबरोबरच त्यांचे शैक्षणिक कार्यातही मोठा सहभाग असतो. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन ते आपला वाढदिवस साजरा करतात. भगवान बाबांच्या, तुकाई मातेच्या आशिर्वादाने त्यांना दिर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना भिमराज आव्हाड म्हणाले, चांगले काम करताना हा चांगल्या माणसांना त्रास हा होतच असतो, म्हणुन काम थांबावयाचे नसते. गोर गरीब, वंचित घटकांची सेवा मी करीत राहील असे ते म्हणाले.
यावेळी आसाराम आव्हाड (भजनी), भास्कर आव्हाड (नाना) यांची भाषणे झाली. ग्रामस्थांनी दाखविलेला विश्वास, प्रेम याबद्दल सौ.वैशाली आव्हाड यांनी सर्वांचे आभार मानले.