अहमदनगर
भिंगार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, अनैसर्गिक संभोग, जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याच्या गुन्ह्यातील (146/2023)आरोपी साहिल मोहमंद सय्यद (भिंगार )याने शुक्रवार दिनांक 15 रोजी जिल्हा कारागृहातील बंदी (आरोपी )मुलाखत कक्षात जेल पोलीस याच्याशी वाद घालून कक्षातील खिडकीची काच फोडल्याची घटना घडली. या घटनेत काच फोडल्याने आरोपी किरकोळ जखमी झाला. त्यास उपचारासाठी सिव्हिलमध्ये पाठविण्यात आले. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी मीरा हेगडे यांनी फिर्याद दिली. कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भा द वि 186,427 प्रमाणे नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समजलेली माहिती अशी
भिंगार पोलीस ठाण्यात दाखल वरील गुन्ह्यातील आरोपी साहिल सय्यद यांस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 3 यांच्या आदेशानुसार 14/3/2023 पासून जिल्हा कारागृहत ठेवण्यात आले होते.नियमानुसार त्यांच्या नातेवाईकास भेटण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहाची वेळ देण्यात आली होती. यावेळी आरोपी व नातेवाईक हे वीस मिनिटे बोलत होते. त्यांची वेळ संपल्याने त्यांना, वेळ संपली बाहेर जावे असे सांगण्यात आले. त्यानंतरही पाच मिनिटे देण्यात आली. त्यानंतर जाण्यास सांगितले म्हणून आरोपी साहिल याने जेल कर्मचारी यांच्याशी वाद घातला त्यानंतर आरोपीने मुलाखत कक्षातील काच हाताने मारून फोडली. यात कारागृहाचे नुकसान झाले व आरोपी जखमी झाला. यावेळी जिल्हा कारागृह वर्ग 2 अधिक्षक प्रमोद जगताप यांनी सदर घटना पोलीस मुख्यालयास सांगून पोलीस बोलावून आरोपीस सिव्हिल ला पाठविले
त्यानंतर आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. सदर घटनेचा तपास कोतवाली पोलीस करीत आहे. या घटनेमुळे जेल व पोलीस दलात पळापळ झाली.
जिल्हा कारागृहात बलात्कार प्रकरणातील आरोपीचा धुडगूस, मुलाखत कक्षाची काच फोडली
- Advertisement -