मेजर अशोक नामदेव सातव शहीद ; श्रीगोंदा येथील आरणगाव दुमाला येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार.
श्रीगोंदा प्रतिनिधी –
श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र मेजर अशोक नामदेव सातव ( नाईक ) यांचा दिल्ली येथे ऐ.एम.सी बेस हॉस्पिटल येथे कार्यरत असताना शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत .त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता अरणगाव दुमाला सातव वाडी येथे होणार आहे.
शहीद मेजर अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलामध्ये आर्मी मेडिकल कोर रेजिमेंट म्हणून कार्यरत होते . आतापर्यंत त्यांनी जम्मू काश्मीर ,उधमपूर,दिल्ली,आसाम इत्यादी ठिकाणी तब्बल वीस वर्षे देशसेवा केली होती.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगी, एक भाऊ,दोन बहिण,दोन चुलते,चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने आरणगाव दुमाला सह पंचक्रोशी मध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी श्रीगोंदा ,पारनेर , कर्जत- जामखेड ,शिरूर तालुक्यासह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक ,सैनिक संघटना उपस्थित राहणार आहेत.