रुडगाव रोड आयटीआय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा संपन्न
इतिहासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करायचे – आमदार संग्राम जगताप
नगर : समाजामध्ये काम करीत असताना वैचारिक बांधिलकी जोपासत चांगले काम उभे करणे गरजेचे आहे, शहर विकासासाठी नागरिकांनी मतरुपी काम करण्याची संधी दिली आहे त्या माध्यमातून नियोजनबद्ध व कायमस्वरूपीच्या विकासाला गती दिली आहे, माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी नेहमीच चांगल्या विचारातून नवनवीन संकल्पना समाजासमोर मांडण्याचे काम केले आहे, शहराला 500 वर्षाचा महान इतिहास आहे तो एकत्रित मांडण्याचे काम केले आहे, इतिहासकार भूषण देशमुख आपल्या शहराचे ब्रँडिंग करत असून खरा इतिहास जोपासत समाजासमोर आणण्याचे काम करत आहे, बुरुडगाव रोड येथे साकारण्यात आलेला इतिहास आजच्या युवा पिढीला ऊर्जा व प्रेरणा देत राहील विकास कामातून शहरांमध्ये शांतता व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे, त्यामुळेच शहर विस्तारीकरणाला वाव मिळाला, नकाशावरचे रस्ते प्रत्यक्षात साकारले, त्यामुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न देखील मार्गी लावला, विकासाचा वारसा जोपासत विकसित शहर निर्माण करण्याचे काम सुरू आहे, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
बुरुडगाव रोड आयटीआय गेट शेजारील भिंतीवर माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऐतिहासिक चित्रांचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मनपा माजी उपमहापौर गणेश भोसले, इतिहासकार भूषण देशमुख, आयटीआयचे प्राचार्य के ए जागीरदार, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, विपुल शेटीया, इंजि. श्रीकांत निंबाळकर, शिल्पकार सचिन विटणकर, अभिजीत चिप्पा, मुकेश मुळे, शहनवाज जहागीरदार, गौतम जायभाय, विनायक भुतकर, सतीश गुगळे, विजय फुलसौंदर, नामदेव भोसले, संतोष भोसले, सुनील भोसले आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, बुरुडगाव रोड परिसर विकास कामातून शांत, सुरक्षित, स्वच्छ आणि हरित झाला असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणे राहण्यासाठी येत आहे त्यामुळे रेसिडेन्सी भाग म्हणून ओळखला जात आहे पूर्वी नागरिक सावेडी उपनगरामध्ये राहण्यासाठी पसंती देत होते मात्र आता बुरुडगाव रोड भागाला पसंती देत आहे, नियोजनबद्ध विकास कामे केल्यामुळेच टप्प्याटप्प्याने सर्वच विकासाची कामे मार्गी लागले आहेत, आता पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी म्युझिकल फाऊंटन, रस्त्यांचे सुशोभीकरण, ऐतिहासिक चित्रे निर्माण केले आहे ही सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य आहे. इतिहासकार भूषण देशमुख यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्याचा इतिहास एका प्रभागांमध्ये आणण्याचे काम केले आहे त्या माध्यमातून नगर शहराची ऐतिहासिक ओळख निर्माण होईल असे प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले
इतिहासकार भूषण देशमुख म्हणाले की, नगर शहर हे एक महान असून याला इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला आहे हे जोपासण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे, माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेनुसार भिंतीवर इतिहासाची रेखाटलेली चित्रे आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, तसेच आमदार संग्राम जगताप यांनी देखील चांगल्या कामाच्या पाठीमागे उभे राहत शहर विकासाला चालना दिली असल्याचे ते म्हणाले
प्राचार्य के ए जागीरदार म्हणाले की, शहरातील मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लागली जात आहे म्हणूनच नवनवीन संकल्पना शहरात साकारत असलेल्या दिसत आहे बुरुडगाव रोड परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचे हॉस्पिटल निर्माण होत आहे त्याचबरोबर विद्यार्थी दशेमध्येच चांगला खेळाडू निर्माण व्हावा यासाठी सारसनगर येथे क्रीडा संकुल तयार होताना दिसत आहे शहरांमधील विविध रस्त्यांची काँक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे सुरू असल्याचे दिसत आहे या सर्व कामाच्या पाठीमागे आ. संग्राम जगताप असून ते खऱ्या अर्थाने शहर विकासाला गती देत आहे असे ते म्हणाले.
यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश गुगळे आणि आभार प्रदर्शन संजय चोपडा यांनी मानले.