बुरुडगाव रोड आयटीआय गेट शेजारील भिंतीवर मा.उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारली ऐतिहासिक चित्रे.
इतिहास हा समाजाला दिशादर्शक व प्रेरणा देणारा – मा.उपमहापौर गणेश भोसले
नगर : शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तो जोपासण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. या माध्यमातून आजच्या युवा पिढीला इतिहासाची ओळख निर्माण होईल. इतिहास हा समाजाला दिशादर्शक व प्रेरणा देणारा आहे. नगर जिल्हासह शहरात ऐतिहासिक स्थळे मोठ्या प्रमाणात असून त्याची माहिती नगरकरांना हवी यासाठी एकाच भिंतीवर फायबर द्वारे चित्र रेखाटण्यात आली आहे. दिनांक ६ जुलै शनिवारी सायंकाळी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मनपा मा.उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली
बुरुडगाव रोड आयटीआय गेट शेजारील भिंतीवर महापालिकेच्या माध्यमातून फायबरद्वारे ऐतिहासिक चित्रे रेखाटण्यात आले असून त्याची पाहणी माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले आहे. यावेळी अभिजीत चिप्पा,राजू भुजबळ, गणेश गायकवाड, प्रशांत तांबे व नागरिक उपस्थित होते.
चौकट अहमदनगर मनपाच्या माध्यमातून बुरुड गाव रोडवर 100 फूट आरसीसी भिंत तयार करण्यात आले असून त्यावरती फायबरद्वारे ऐतिहासिक चित्रे रेखाटण्यात आली यामध्ये भुईकोट किल्ला,हश्त बिहिश्त महाल,चांदबिबी महाल,शाह शरीफ दर्गा,फराह बख्क्ष महाल,भातोडीच नृसिंह मंदिर,अवतार मेहेर बाबांची समाधी, पैस खांब संत ज्ञानेश्वर महाराज,ह्युम मेमोरियल चर्च,अमृतेश्वर मंदिर,अहमदनगर रेल्वे स्टेशन,लोखंडी पुल,शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर,चौथे शिवाजी महाराज स्मारक,आनंद धाम,बागरोजा महाल आदि चित्रे रेखाटण्यात आली असल्याची माहिती मा.उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.