बाजार समितीचे भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस बंदबाबत जाहिर आवाहन
कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सालाबादप्रमाणे श्री. संत निवृत्तीनाथ
महाराज पालखी सोहळा, श्री क्षेत्र त्रंबकेश्वरवरुन श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळा मंगळवार दिनांक ०२/०७/२०२४ व बुधवार दिनांक ०३/०७/२०२४ या दोन दिवसांकरीता मुक्कामासाठी येणार असून दिनांक ०४/०७/२०२४ रोजी प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी असून दिंडीमध्ये सुमारे ५०,००० वारकरी सहभागी आहेत. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक ०३/०७/२०२४ व गुरुवार दिनांक ०४/०७/२०२४ या दोन दिवसांकरीता समितीच्या मुख्य बाजाराचे भुसार व भाजीपाला बाजार बंद, राहणार असून शुक्रवार दिनांक ०५/०७/२०२४ रोजीपासून बाजार नियमित चालु राहील. त्यामुळे भुसार, फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकरी बांधवानी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे. यावेळेस समितीचे सर्व संचालक मंडळ, सचिव अभय भिसे, सहा. सचिव बाळासाहेब लबडे, सहा. सचिव सचिन सातपुते, सहा. सचिव संजय काळे हे उपस्थित होते.