‘बिग बॉस मराठी ५’ मध्ये पहिल्या आठवड्यातच खूप भांडणं झाली. अनेकांचे वाद झाले, स्पर्धकांनी नियम मोडले व त्यांना शिक्षाही झाली. या घरात निक्की तांबोळी हिने वर्षा उसगांवकरांचा अपमान केला होता. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. ‘बिग बॉस मराठी’च्या घराला कंट्रोल करताना निक्की दिसून आली. आपल्या हिंमतीने आणि डोक्याने तिने अनेक गोष्टी केल्या. पण मुद्दा बरोबर असला तरी तिची भाषा चुकीची होती. त्यामुळे रितेश भाऊ त्याच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर तिचा माज उतरवणार आहे. निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अनादर करताना दिसून आली. त्यामुळे रितेश देशमुख निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,”वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.”
Big Boss Marathi… आताच्या आता मराठी माणसांची माफी माग…रितेश देशमुख कोणावर भडकला? Video
- Advertisement -