घटना उत्तर प्रदेशमधील शाहगंज या ठिकाणी घडली आहे. तर त्याचं झालं असं की, SBI बँकेच्या शाखेमध्ये एक बैल शिरला होता. हा बैल बँकेत कसा शिरला हे तर देवालाच ठावूक. पण त्याला पाहून बँकेत एकच गोंधळ माजला. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाला. पण बैल काही बाहेरच पडेना. शेवटी सुरक्षारक्षकांनी काठीचा धाक दाखवून त्याला त्याला बँकेबाहेर काढलं. हा व्हिडीओ @DineshKumarLive या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून हजारो नेटकऱ्यांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
https://x.com/DineshKumarLive/status/1745001932664787329?s=20