Monday, March 4, 2024

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मनोज जरांगेंना मिळणार 24 तास दोन सशस्त्र पोलीसांचा बंदोबस्त…

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे. काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून दोन कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे यांना आता जिल्ह्यातील पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जात होती

मनोज जरांगे यांना आता कायमस्वरूपी दोन पोलीस कॉन्स्टेबलची सुरक्षा पुरवली जाणार आहे. गोदी पोलिस स्टेशनच्या दोन कॉन्स्टेबलची नियुक्ती ही केल्या जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles