वकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठी घट आली होती. परंतु चांगला भाव मिळत असल्याने लसणाचे उत्पन्न भरून निघत आहे.
रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या लसणची आवक कमी झाल्याने लसणाच्या भाव गगनात भिडला आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये लसणाला तब्बल ५०० रुपये किलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या गणित बिघडले आ
पंधरा दिवसांपूर्वी लसूणच्या भाव प्रतिकिलो २५० ते २६० रुपये इतका होता. मात्र अवकाळी पावसामुळे लसणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, लसूणची आवक चांगलीच घटली आहे. यामुळे सद्यस्थितीला लसूणचे भाव ५०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. लसणाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. परंतु अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात मोठी घट आली होती. परंतु चांगला भाव मिळत असल्याने लसणाचे उत्पन्न भरून निघत आहे.स्वयंपाकात फोडणी देताना लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. मात्र सध्या लसूणच्या दरात मोठी वाढ झाल्याने फोडणीत लसणाचे प्रमाण कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
Garlic Price : लसूण उत्पादनात मोठी घट, बाजार समितीमध्ये लसणाला भाव
- Advertisement -