Monday, December 4, 2023

मोठी बातमी! राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका लांबणार? समोर आलं मोठं कारण..

राज्यात निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 2 हजार 669 ग्रामपंचायतींसाठी येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

यासोबतच 2 हजार 950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे. मात्र आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? निवडणुका लांबणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्यात निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचातय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. नागपूरसह इतर जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये केला आहे. निवडणूक घेण्यापूर्वी सरपंचपदाच्या आरक्षणात आवश्यक सुधारणा करण्याची मागणी याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेमध्ये केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील जलालखेड्याचे सरपंच गुणवंत काळे यांनी नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलं जाऊ शकत नाही, असं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३ तारखेला राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. येत्या पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यासोबतच 2 हजार 950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान होणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: