राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाने मोठा दिलासा आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला ६ ऑक्टोबरपर्यंत रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्यचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीला काल मध्यरात्री २ वाजता नोटीस पाठविण्यात आली होती. बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवत दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवारांना 72 तासांचा वेळ दिला होता.
आज मुंबई हायकोर्टाकडून रोहित पवार यांना बारामती अॅग्रोबाबत दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. तर बारामती ॲग्रोबाबत सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे.