बीडमधील भाजप नेत्याने बंडाचे निशाण फडकावले आहे. मोहन जगताप यांनी भाजपवर गंभीर आरोप करत बंड पुकारण्याचे संकेत दिले आहेत.बीडमधील भाजप नेते मोहन जगताप भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज झालेल्या सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. त्याशिवाय भाजपवर गंभीर आरोपही केले. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला. ब्लॅकमेलिंग केलं आणि माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार, असे स्पष्ट मत मोहन जगताप यांनी व्यक्त केलेय.
राजकारणात थापा मारणं आणि लबाड बोलणं सुरु आहे. गेल्यावेळेस माझा राजकीय गेम केला, ब्लॅकमेलिंग केलं अन माझं तिकीट कापलं. मात्र मी आता ठरवलंय मी जनतेच्या दारात उभारणार आहे, असे मोहन जगताप म्हणाले.पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय म्हणून मोहन जगताप यांची ओळख आहे. सध्या ते भाजपचे माजलगाव विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पण विधानसभा निवडणुकीआधीच मोहन जगताप यांनी बंडखोरी करणार असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितलेय.पक्षाचे तिकीट मिळेल की नाही, हे सांगता येत नाही. मात्र मी तुमच्या तिकिटावर उभा राहणार आहे. काही टगे इकडे तिकडे फिरून तिकीट न मिळण्याचा प्रयत्न करतील. मात्र मी उभा राहणार आहे. तुम्हाला जर 10 टक्के घेणारा आमदार पाहिजे असेल तर मी हात जोडतो, अन्यथा मला साथ द्या, असे मोहन जगताप म्हणाले.
मी टक्केवारी घेणार नाही, जर मी चांगला आमदार म्हणून नाही राहिलो, तर माझं नाक कापून टाकील. त्यामुळं मी तुमच्या जीवावर नशीबासोबत मी संघर्ष करेल, असे वक्तव्य मोहन जगताप यांनी केलेय.