पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवालची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. विशाल अग्रवालची पोलिस कोठडी आज संपली. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालसोबत इतर ५ ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोर्टाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवाल याचा जामीनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचे वकील आजच जामीनासाठी अर्ज करू शकतात. विशाल अग्रवाल हे कारचालक अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आहेत. १९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये अपघाताची घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.