Match Stick इंस्टाग्रामवर, @thefoodiehat या अकाउंटवर अभिषेक या क्रिएटरने सदर व्हिडीओ पोस्ट केला होता. कॅप्शननुसार ही क्लिप तामिळनाडू मध्ये शूट करण्यात आली आहे. हे ठिकाणी देशातील सर्वात मोठे काडेपेटी उत्पादनाचे स्थळ म्हणून ओळखले जाते असेही कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे. तुम्ही बघू शकता मोठमोठ्या मशिन्स वापरून अगदी बारीक बारीक काम सुद्धा अत्यंत लक्षपूर्वक केले जात आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काही कामगार झाडाचे खोड फोडून त्याला पातळ शीट्स मध्ये बदलताना दिसतात आणि मग या चादरी इतक्या बारीक शीट्सना कापून माचीस तयार केली जाते. नंतर चॉकलेटचा झरा वाटावा अशा ज्वलनशील पदार्थाच्या पेस्टमध्ये या काड्यांचे तोंड बुडवले जाते. या तयार माचीसच्या काड्या पेट्यांमध्ये भरून मग पॅक केल्या जातात.
Video : पत्नीने घेतला भन्नाट उखाणा… नवरीचा हा जोरदार उखाणा ऐकून थक्क व्हाल