बिहारमधील दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये डॉक्टर मद्य पार्टी करताना दिसत आहेत. दरम्यान, डॉक्टरांच्या या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या कथित व्हिडीओमध्ये डॉक्टर दरभंगा रुग्णालयाच्या गेस्ट हाऊसमध्ये पार्टी करीत आहेत आणि खुलेआम मद्याचे सेवन करीत असल्याचे दिसत आहे. बिहार हे संपूर्ण मद्यबंदी असलेले राज्य आहे; जिथे दारूची विक्री आणि खरेदी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या या मद्याच्या पार्टीची आता दरभंगाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
https://x.com/nazrealam19/status/1736078756824191486?s=20
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती गेस्ट हाऊसमधील एका खोलीत कॅमेरा घेऊन जाते तेव्हा तिथे काही डॉक्टर पार्टी करताना दिसत आहेत. बिहार हे संपूर्ण मद्यबंदी असलेले राज्य आहे; जिथे दारूची विक्री आणि खरेदी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या या मद्याच्या पार्टीची आता दरभंगाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अवकाश कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक व्यक्ती गेस्ट हाऊसमधील एका खोलीत कॅमेरा घेऊन जाते तेव्हा तिथे काही डॉक्टर पार्टी करताना दिसत आहेत.