ही घटना बिहारमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशमधून दारूच्या बाटल्या तो बिहारमध्ये आणत होता. यासाठी त्यानं थेट पुस्तकांची मदत घेतली. मोठ्या जाड पुस्तकांना मधोमध कोरून त्यामध्ये या बाटल्या ठेवल्या होत्या. व या बाटल्या ठेवलेल्या पुस्तकांवर आणखी काही पुस्तकं ठेवली होती. जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण पोलिसांना या दारू तस्करीची टीप मिळाली. आणि तो अखेर पकडला गेला. पोलिसांनी रिक्षा रोखली आणि पुस्तकांची झडती घेतली. त्यावेळी मधल्या पुस्तकांमध्ये दारू सापडली. दरम्यान पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून या तस्करी करणाऱ्या चोराला अटक केली आहे.
- Advertisement -