भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. दररोज कुठले ना कुठले जुगाड समोर येत असतात. याच पार्श्वभूमीवर एक जुगाडू बाईक समोर आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या बाईकला अशा पद्धतीनं मॉडिफाय केलंय की त्याचं एक्सिलेटर हँडलऐवजी पायाजवळ आहे. त्यामुळे बाईकचा वेग आणि गेअर तुम्ही एकाच वेळी बदलू शकता. Rdx____chhoti_______785 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ ५ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.
या बाईकमध्ये कार सारखी सिस्टम आहे. या बाईकचं एक्सिलेटर हँडलवर नसून चक्क पायाजवळ आहे. ही बाईक कुठल्याही कंपनीनं नाही तर एका तरुणानं आपल्या घरातच जुगाड करून तयार केलीये.