Saturday, September 14, 2024

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार , नगर कल्याण महामार्गावरील घटना

नगर – चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या टाटा कंपनीच्या छोटा हत्ती या मालवाहू टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नगर – कल्याण महामार्गावर कर्जुले हर्या गावच्या शिवारात मंगळवारी (दि.१३) सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. शंकर म्हातारबा वाघ (वय ३०, रा. कर्जुले हर्या, ता. पारनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

मयत शंकर वाघ हा त्यांचे मोटार सायकलवर (क्र. एम.एच.१६ डी. एच. ४१८३) कर्जुले हर्या वरुन टाकळी ढोकेश्वर बाजु कडे जात असताना नगरहून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा कंपनीचा छोटा हत्ती (क्र. एम.एच.१६ सी.डी. ७३४९) या वरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहण भरधाव वेगात राँग साईडला घेवुन येवून शंकर याचे मोटार सायकल ला जोराची धडक दिली.

त्यामुळे शंकर हा रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. तसेच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला. याबाबत मयताचा भाऊ सागर म्हातारबा वाघ याने टाकळी ढोकेश्वर पोलीस दुरक्षेत्र येथे दिलेल्या फिर्यादी वरून पारनेर पोलिस ठाण्यात टेम्पोचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles