सध्याच्या तरुणाईला लागलेले सोशल मीडियाचे वेड भयंकर आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या एका तरुणाचा असाच एक धक्कादायक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामधील तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी त्याच्या चांगलीच अंगलट आल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर बाईक स्टंटचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करतानाचे व्हिडिओ अनेकदा लक्ष वेधतात. अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमधील बाईकस्वार चालू गाडीवर स्टंट करताना दिसत आहे.
हा तरुण वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर वेडीवाकडी बाईक चालवत लक्ष वेधत आहे. मात्र हा स्टंट (Stunt Video) करताना त्याचा गाडीवरील ताबा सुटतो आणि भीषण अपघात होतो.
A biker falls off his bike attempting to perform a dangerous stunt on the road.#RoadSafety#SafeDriving#RecklessDriving#ActResponsibly pic.twitter.com/3h2P4uJdwZ
— Deccan Chronicle (@DeccanChronicle) December 3, 2023