Sunday, December 8, 2024

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती,वार्षिक पारितोषिक वितरण

सावित्रीपुत्र तेजस दिलीप अभंग,सावित्री कन्या दिविका अनिरुद्ध कुलकर्णी ,ईश्वरी सुनील तोडमल यांना तर आदर्श शिक्षक रवींद्र अशोक हरिचंद्रे  व रवींद्र रत्नाकर हिवाळे ,प्राथमिक विभाग आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर ढोकणे,आदर्श शिक्षिकाश्रीमती भाग्यश्री शेटे इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श शिक्षक नवनाथ निकाळजे तर आदर्श शिक्षिका वृषाली बाबर यांना देण्यात आल्याची शाळेचे प्राचार्य अरुण तुपविहिरे सर यांनी दिली. 
राहुरी  विद्यापीठ – प्रतिनिधी ,(  देवराज मंतोंडे यास कडून)
 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथेक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व मातृदिन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ . पी . जी .पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. पी . जी.पाटील होते .या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे कवी अरुण म्हात्रे, पुणे येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.उमेश नागरे  विदुला माने, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.महानंद माने, खजिनदार  महेश घाडगे, राहुल वंजारी, डी.बी.क्षीरसागर,राजू राठोडउपस्थित होते. याप्रसंगी मातृदिनानिमित्त विदुला माने यांचा सन्मान करण्यात आला आहे.

प्रास्ताविक जितेंद्र मेटकर यांनी केले .

कुलगुरू डॉ. पी .जी .पाटील यांनी केले .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शाळेमध्ये शिकत असताना थोर विचारवंतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश संपादन करा .विविध उपक्रमामुळे शाळेचा लौकिक होत असल्याने आनंद झाल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .गेल्या दोन वर्षांमध्ये शाळेच्या प्रगतीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त करून विविध स्पर्धेमध्ये उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    डॉ. उमेश नागरे यांनी शालेय स्पर्धांमधील सहभागाचा जीवनामध्ये कसा उपयोग होतो हे सांगून उत्कृष्ट मार्गदर्शन केले .आपला जीवनपट उलगडताना मी याच शाळेत शिकलो आणि डॉक्टर झालो तरीही या शाळेची नाळ आजही आहे.सावित्रीबाई फुले जयंती निमित्त या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलावल्यामुळे त्यांनी संस्थेचे मनस्वी आभार मानले.

सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कवितांच्या मैफिलीत उपस्थितांना व विद्यार्थ्यांना आपल्या कवितेमध्ये रंगवून वातावरण प्रसन्न केले .अनेक कविता त्यांनी विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन गाऊन दाखवल्या .

 या कार्यक्रमांमध्ये विद्यालयाचे सचिव डॉ. महानंद माने यांनी सांगितले की जीवन जगताना चांगला नागरिक घडणे गरजेचे आहे आणि हेच काम आमची शाळा करत असल्याचा अभिमान आम्हाला होत आहे .शाळेमध्ये घडलेला बदल ,यशस्वी विद्यार्थी,त्यांना सहकार्य करणारे शिक्षक व पालक यांचे डॉ. माने यांनी आभार मानले

.विद्यालयातील विविध उपक्रमात व स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आला.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे , पर्वेक्षक  मनोज बावा,प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खेत्री व इंग्रजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता आठरे सह सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टेमकर सुरेखा व शेटे भाग्यश्री यांनी केले.सर्वात शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles