पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये तीन राज्यात मोठ्या फरकाने विजयी झालेल्या भाजपाने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपाचे सरकार येणार आहे. आता भाजपाचे जे खासदार विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. ते आता लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. अशा भाजपा 12 खासदारांनी बुधवारी राजीनामा दिला आहे.
भाजपाने यंदा चार राज्यातील विधानसभा निवडणूकीत 21 खासदारांना तिकीट देऊन उभे केले होते. राजस्थान आणि मध्य प्रदेशात सात-सात खासदारांनी निवडणूक लढविली होती. तर छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणात तीन खासदारांना भाजपाने विधानसभेचे तिकीट दिले होते.
राजीनामा देणारे खासदार
राजस्थान –
– राज्यवर्धन राठोड
– दीया कुमारी
– किरोडीलाल मीना ( राज्यसभा सदस्य )
मध्य प्रदेश –
– नरेंद्र तोमर
– प्रल्हाद पटेल – राकेश सिंह
– रीती पाठक
– उदयप्रताप सिंह
छत्तीसगढ़
– गोमती साई
– अरुण साव