Tuesday, December 5, 2023

लोकसभा निवडणुकांसाठी भाजप अॅक्शन मोडवर; देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात आतापासूनच रण तापलं आहे. भाजपनं रणनीती आखली असून, तिच्या अंमलबजावणीलाही सुरुवात केल्याचं दिसतं. भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपने मार्गदर्शन शिबीर आयोजित केले असून, फडणवीस हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. आतापासून सर्व राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण देशाचं राजकारण ज्या महाराष्ट्राभोवती फिरतंय, तिथेच थेट अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे दिसते.

मुंबईतील भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे. पुढील दोन दिवस ते भरवलं जाणार असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रमुख या शिबिराला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं ‘महाविजय २०२४’ मोहीम हाती घेतलीय. त्यानुसार पक्षाने रणनीती आखली आहे. संपूर्ण राज्यात वॉररूमचं जाळं उभारलंय.

वॉररूममधून २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष असणार आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलीय. आता विधानसभा क्षेत्रांतील आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि बुथप्रमुखांची एक टीम तयार केली होती. योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचली की नाही याचा आढावा बैठकीत घेणार आहेत.

प्रत्येक मतदारसंघ आणि उमेदवारांवर वॉररूमद्वारे भाजप लक्ष ठेवणार आहे. मतदारसंघांतील समस्या आणि महत्वाच्या विषयांची माहितीही घेतली जाईल.

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत सोबत घेण्याच्या संदर्भातही शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: