भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली.
या प्रकरणाचा विस्तार वाढत असल्याचं दिसून आल्यावर
भाजपने अजित पवार यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. याबाबत स्वत: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जाहीर माफी मागितली आहे. तसेच आपण या विषयी गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचित करु, अशीही प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलीय.
पक्षीय राजकारणाची टीका होऊ शकते. व्यक्तीगत टीका होऊ शकत नाही. पडळकर जे काही बोलले आहेत त्याबद्दल मी अजित पवारांना सांगेन, त्यांनी मोठ्या मनाने माफ करावं. शेवटी एक जबाबदार विधान परिषदेच्या सदस्याने या पद्धतीने बोलू नये. भाजपचे ते जबाबदार नेते आहे. त्यामुळे त्यांना मी बोलणार आहे. अजित पवार यांचं जे मन दुखावलं आहे त्याबद्दल मी क्षमा मागतो’, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली.