Monday, April 28, 2025

भाजपच ठरलं….2024 ला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ…ठिकाणही निश्चित…

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या ठिकाणी शानदार विजय मिळवल्यानंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे आपलं लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे सांगत त्या शपथ विधीचं ठिकाण सुद्धा घोषित केले आहे. २०१४ ला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेला देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी २०२४ लाही होणार असा हुंकार भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरलाय. भंडाऱ्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांच्या संपर्क मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव वधवून घेतलंय. नुकतेच पाच राज्याचे निकाल लागलेत. ज्यामध्ये ३ राज्यात भाजपने दणक्यात विजय मिळवलाय. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बावनकुळे यांनी महाराष्ट्रात पुढचे मुख्यमंत्री फडणवीस असतील असं म्हणत शपथ विधीचं ठिकाणही घोषित केलंय.

भाजपाच्या विजयानंतर सोशल मीडियावर PM मोदींचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles