Monday, April 22, 2024

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला दोन मोठे धक्के, दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपचं कमळ हाती घेणं पसंत केलंय. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्यापाठोपाठ आता दोन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.
मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि माजी खासदार गजेंद्र राजुखेडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच संजय शुक्ला, विशाल पटेल, माजी आमदार अर्जुन पालिया, माजी आमदार अर्जुन पालिया यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुरेश पचौरी यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सुरेश पचौरी यांनी भोजपूरमधून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली आहे. ते दोन्ही वेळा भाजपच्या सुरेंद्र पटवा यांच्याकडून निवडणुकीत पराभूत झाले होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles