लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. मला विचारायचं आहे की जनादेशाची हत्या करण्याचं काम कुणी केलं. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना एकच सवाल आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय काल राजकाणात आले आहेत का? मी मोहिनी घातली आणि ते माझ्या मागे आले. असं घडलेलं नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. आणखी एक स्पष्टपणे सांगतो माझ्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जी युती झाली ती आमची भावनिक युती झाली. वादळं आली असतील, व्यक्ती व्यक्तींचं काही झालं असेल पण भावनिक युती आहे. राष्ट्रवादी युती आहे ती राजकीय मैत्री आहे. कदाचित ती पण भावनिक मैत्री येत्या काळात होईल. पण आज हे आमच्या मनात हे स्पष्ट आहे. आज आपण देशात सगळे पक्ष एकत्र येऊन मोदीजी नको अशी भावना सातत्याने मांडत आहेत. काय केलंय मोदींनी? देशाला अकराव्या क्रमांकावरुन पाचव्य क्रमाकांच्या अर्थव्यवस्थेवर आणलं. भारताने गरिबी कमी कऱण्याचं काम दहा वर्षात जे केलंय ते अविश्वसनीय आहे हे इंटरनॅशन मॉनिटरिंग समिती सांगते. जगात भारताचा डंका वाजतो आहे. जगात सर्वाद जास्त रोजगाराच्या संधी भारतात तयार होणार आहे. आज ज्यावेळी सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत तेव्हा हे म्हणून चालणार नाही की आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊ पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेसचा विचार चालणार नाही. काँग्रेसचा विचार तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष आम्ही बरोबर घेणार नाही. एमआयएम, मुस्लीम लिग यांनाही आम्ही बरोबर घेणार नाही. फाळणी कुणामुळे झाली? अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांमुळे झाली. देशाचं विभाजन झालं तरी तुष्टीकरणाची नीती संपलेली नाही. त्यामुळे असं कुणालाही बरोबर घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. जे कुणी येतील त्यांचं स्वागत करु पण पक्षाची जी तयारी आहे ती वाया जाऊ देणार नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणतात… एकनाथ शिंदेंशी आमची भावनिक युती, अजित पवारांबरोबर राजकीय युती….
- Advertisement -