Wednesday, November 13, 2024

नेवाशात विधानसभेसाठी लंघेंचे भाजपमधून शिवसेनेत सीमोल्लंघन? राजकीय चर्चांना जोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना, नेवाशातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंके आणि संगमनेरातून अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.नगर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघातील विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. पण या महत्त्वाच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. आता या उमेदवारी जाहीर झाल्याने या पक्षाच्यावतीने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्र्रेस व अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर झाले. पण शिंदे सेनेच्या उमेदवारांबाबत उत्सुकता होती. या मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे यांच्यासह अनेकजण उत्सुक होते. अखेर कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने शिवसेनेच्या शिंदे गटातून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सुरू असलेली डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा संपुष्टात आली आहे. खताळ सध्या भाजपात आहेत. विखे गटाचे समर्थक म्हणून ते संगमनेर मतदारसंघात सक्रीय आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि संगमनेर मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुखपद त्यांच्याकडे आहे. मात्र आता मित्र पक्षात प्रवेश करून ते निवडणूक रिंगणात उतरतील. त्यामुळे यापुढे डॉ.सुजय विखे पाटील आपल्या कार्यकर्त्यासाठी मतदारसंघात आक्रमक प्रचार करताना दिसून येतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान नेवासा तालुका प्रतिनिधीने कळविले की, नेवाशातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी 2004 मध्ये नरेंद्र घुले पाटील यांचे विरुद्ध तर 2009 मध्ये शंकरराव गडाख यांचे विरुद्ध भाजपाचे तिकिटावर निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस त्यांना थोड्या मताने पराभव पत्करावा लागला होता. 2009 मध्ये शंकरराव गडाख नेवास स्वतंत्र नेवासा मतदार संघाचे आमदार झाल्यानंतर लंघे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित
आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles