Wednesday, April 17, 2024

कारसेवक ते राज्यसभा सदस्य…कोण आहेत भाजपचे डॉ. अजित गोपछडे? वाचा सविस्तर….

राज्यातील 6 जागांसाठी २७ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण, भाजपच्या पुण्यातील निष्ठावंत नेत्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांच्या नावांचा समावेश आहे.

राजकीय वर्तुळाला अद्याप डॉ. अजित गोपछडे हे नाव तितकेसे परिचित नाही. मात्र, अजित गोपछडे हे भाजपच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एक आहे. याशिवाय, ते एक कारसेवकही आहेत. पेशाने डॉक्टर असलेले अजित गोपछडे हे भाजपच्या वर्तुळातही फारसे माहिती नसलेले नाव आहे. ते भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रमुख आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्यरत असलेले बालरोगतज्ज्ञ अशी अजित गोपछडे यांची मुख्य ओळख.

अजित गोपछडे हे मुळचे कोल्हे बोरगाव, तालुका बिलोली येथील असून त्यांचे वडील माधवराव गोपछडे आणि त्यांचे काका गोविंदराव गोपछडे हे आहेत.

नांदेडच्या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या अजित गोपछडेंवर लहानपणापासूनच समाजकार्याचे संस्कार झाले.

महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. अयोध्येतील बाबरी मशीद ढाचा उद्धस्त करताना घुमटावर चढणाऱ्या कारसेवकांचा की एक कारसेवक गोपछडे होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles