लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. निकालानंतर सुजय विखे यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून जनसेवेसाठी कायम कटिबध्द राहू अशी ग्वाही दिली. दरम्यान विखेंना जनसेवा कार्यालयात भेटण्यासाठी हजारो समर्थकांनी एकच गर्दी केली. विखेंनीही समर्थकांची हसतमुखाने भेट घेत त्यांना आश्वस्त केले. विखे समर्थकांनी सोशल मिडियावरही पराभवाने आम्ही खचणार नसल्याचे म्हटलय.
- Advertisement -