राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये परतणार अससल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता खडसे यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अलीकडच्या काळात खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजल्या जातं. खडसेंच्या संभाव्या प्रवेशामुळंच रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार खडसे हे भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यातील नेते तसचे केंद्रातील नेते त्यांना विनंती करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
विनोद तावडे यांची शिष्टाई…. एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित!
- Advertisement -