आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
विविध समित्यांचे प्रमुख खालीलप्रमाणे
जाहीरनामा समिती – वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार
विशेष संपर्क – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
सामाजिक संपर्क – राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे
महिला संपर्क – राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर
कृषी क्षेत्र संपर्क – खा. अशोक चव्हाण
लाभार्थी संपर्क – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
युवा संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
प्रचार यंत्रणा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
सहकार क्षेत्र संपर्क – विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर
मीडिया- आ.अतुल भातखळकर
ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था संपर्क – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
अनुसूचित जाती संपर्क – माजी आमदार भाई गिरकर
अनुसूचित जमाती संपर्क – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित
सोशल मीडिया – आ. निरंजन डावखरे
निवडणूक आयोग संपर्क- माजी खा. किरीट सोमय्या
महायुतीचे निवडणूक अभियान समन्वयक म्हणून ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन काम पाहणार आहेत.