देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालाचाली घडत आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. या विरोधकांची इंडिया आघाडी पुढची रणनीती ठरत आहे. त्यानंतर भाजपने देखील आता कंबर कसलं आहे. भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व भाजप आमदारांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. तसेच मंत्रिपदाची अपेक्षा करु नका, पण कामाला लागा, असे आदेशच आमदारांना देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आपल्याला लोकसभेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे कामाला लागा, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेच्या मिशन 45 प्लससाटी भाजपकडून आमदारांवर मोठी जबादारी सोपविण्यात आली आहे.मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व आमदांराना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 च्या महा विजयाचे शिलेदार बना, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.नरेंद्र मोदींच्या देशसेवेत हातभार लावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचं सोनं करा. आजपासूनच पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पुणे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत. त्यामुळे आजपासून कामाला लागा, अशी सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील नवनिर्वाचित कार्यकारणीच्या बैठकीत दिल्या.