Saturday, March 2, 2024

प्रसिद्ध अभिनेत्रीवर भाजपने दिली संघटनेची महत्त्वपूर्ण जबाबदारी…

नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत चित्रपट आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अभिनेत्री किशोरी शहाणे यांची निवड करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांच्या उपस्थितीत चित्रपट आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांच्यासह अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, नाटय़ निर्माते अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles