Tuesday, January 21, 2025

शरद पवारांचा भाजपला आणखी एक मोठा धक्का, बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सध्या अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीची रणनिती आखल्याचं दिसत आहे. समरजित घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता पुण्यात देखील भाजपचे वरिष्ठ नेते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गणेशोत्सवातील एका कार्यक्रमात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे

पुण्यातील वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. पठारे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

बापूसाहेब पठारे सध्या भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट हा भाजपसोबत गेला. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज आहेत. थेट गणपती मंडळाच्या कार्यक्रमातूनच हाती तुतारी घेण्यात असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपलं चिन्ह तुतारी असल्याचं बापूसाहेब पठारे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पठारे हे लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles