Tuesday, May 28, 2024

महायुतीत अस्वस्थता वाढली…. यंदा लोकसभा कठिणच..भाजप मंत्र्याची कबुली…

एबीपी सी व्होटर सर्व्हेमध्ये महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थितीचे चित्रण करण्यात आलं आहे. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. याचेच प्रत्यंतर आज भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रिकेतून समोर आल्याचं दिसतंय.

सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह भेटीगाठी घेतल्या. यानंतर शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी मंगळवेढा शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते .

या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही असं सांगितलं. माढ्याची निवडणूक या आधी कठीण नव्हती, पण आता ती कठीण झाल्याची कबुलीच दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles