राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आपल्याला माहीत आहे की, एकनाथ शिंदे दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. त्यामुळे ते अपात्र होऊ शकत नाहीत. भाजपाने मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे. संख्येच्या आधारावर विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ४० आमदार गेले आहेत. संख्या मोठी असल्याने ते अपात्र होऊ शकत नाहीत. आमदार अपात्र होण्यासाठी विधानसभेत व्हिप काढावा लागतो. प्रतोदने व्हिप काढला आणि त्या व्हिपचं उल्लंघन केलं तर पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून संबंधित आमदार अपात्र होऊ शकतात.”
२९ जूनला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा न देता ३० जूनला विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे गेले असते आणि व्हिप काढला असता, तर तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रश्न निर्माण झाले असते. पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यामुळे हाही प्रश्न उपस्थित होत नाही,” असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.